हिवाळ्यात अचानक वाढणाऱ्या थंडीच्या लाटा आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि दीर्घकालीन आजार असणारे लोक थंडीने लवकर प्रभावित होतात. त्यामुळे योग्य खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खालील उपाय थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात:
थंडीमध्ये काय करावे ?
1. हवामान अपडेट्सकडे लक्ष:
हवामान, तापमान आणि थंडीच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवा आणि अधिकृत सूचनांनुसार त्वरित कृती करा.
2. शक्य तेवढे घरात राहणे:
थंड वाऱ्याचा संपर्क कमी ठेवण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळा.
3. थरदार कपडे परिधान करा:
एक जाड कपडा वापरण्यापेक्षा हलके, श्वसनक्षम, लोकरी कपड्यांचे अनेक थर घाला. हे शरीराचे तापमान अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवतात.
4. शरीर कोरडे ठेवा:
घाम आला किंवा कपडे भिजले तर लगेच बदला. डोके, कान, हात आणि पाय झाकणे अत्यंत गरजेचे कारण उष्णता सर्वाधिक या भागांतून निघून जाते.
5. हातमोजे (Mittens) वापरा:
मिटन प्रकारचे हातमोजे बोटांना एकत्र उष्णता मिळवून देतात, त्यामुळे हात जास्त उबदार राहतात.
6. टोपी, मफलर आणि उबदार बूट:
टोपी घातल्याने शरीरातील 30% उष्णता टिकून राहते. जलरोधक आणि उष्णतारोधक पादत्राणे वापरा.
7. पौष्टिक आहार:
शरीराची उष्णता टिकवण्यासाठी
खात राहा.
8. गरम पेयांचे सेवन:
गरम पाणी, सूप, चहा यामुळे शरीरातील उष्णता संतुलित राहते.
9. त्वचेची काळजी:
त्वचा कोरडी पडू नये म्हणून तेल, पेट्रोलियम जेली, बॉडी क्रीम लावा.
10. वृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी:
त्यांच्या आरोग्याविषयी नियमित विचारपूस करा. एकटे राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींना विशेष मदत करा.
11. हुडहुडी भरल्यास लगेच उपाय:
ही हायपोथर्मियाची प्राथमिक सूचना असते. त्वरित उबदार ठिकाणी जा.
12. वैद्यकीय मदत:
हिमबाधा (Frostbite) किंवा हायपोथर्मियाची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.
13. जनावरांचीही काळजी:
पाळीव प्राणी आणि गुरांना उबदार निवाऱ्याची व्यवस्था करा.
हिवाळ्यात थंडीची लाट गंभीर आरोग्य संकट निर्माण करू शकते. मात्र योग्य खबरदारी, वेळेवर केलेली काळजी आणि सजगता यामुळे आपण व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतो.
सुरक्षित राहा, उबदार राहा आणि इतरांना देखील जागरूक करा!
(WInter, Cold Wave Safety, Collector Office Nandurbar, Winter Alert)
