Home महाराष्ट्र भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम...

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम दादर

Colorful rehearsal of the main government ceremony to be held on the occasion of India's 77th Republic Day Dadar

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. राजशिष्टाचार विभागाच्या उप सचिव क्रांती पाटील यांनी ध्वजवंदन केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांच्या वतीने या रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिन संचलनातील सर्वोत्कृष्ट संचलन पथकांना अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम क्रमांक राज्य राखीव पोलीस बल आणि द्वितीय क्रमांक बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक यांनी तर निशस्त्र दलांमध्ये बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलाने प्रथम क्रमांक पटकावला.

#प्रजासत्ताकदिन

#RepublicDay2026

error: Content is protected !!
Exit mobile version