Home शैक्षणिक जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास 17 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास 17 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Exam
Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Exam

(नंदुरबार) जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या वर्गासाठी शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी होणारी निवड चाचणी प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुव्याचे प्राचार्य जी.पी. मस्के यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. (Deadline for Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Exam has been extended till August 17 2023)

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ

या परीक्षेसाठी उमेदवार https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज नि: शुल्क भरू शकतात तसेच www.navodaya.gov.in वरही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे तेथील मुख्याध्यापकांचा सही शिक्यानिशी संपूर्ण भरलेले स्कॅन केलेले प्रमाणपत्र विद्यार्थी व पालकांची स्कॅन केलेली सही आणि विद्यार्थ्यांचा स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो अर्ज भरताना अपलोड करावे. परीक्षेसाठी विद्यार्थी सन २०२३-२४ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ, तळोदा, शहादा, धडगाव, नवापुर, आणि नंदुरबार शासकीय/शासन मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ५ वी च्या वर्गात शिकत असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 01 मे 2012 पूर्वी व 30 जुलै 2014 नंतर झालेला नसावा. विद्यार्थी हा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी सलग उत्तीर्ण असावा.

अधिक माहितीसाठी कुणाला संपर्क करावा ?

अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवाचे प्राचार्य जी.पी. म्हस्के दूरध्वनी क्रमांक 0257-252260, परिक्षा प्रभारी वी.बी. पाटील मोबाईल क्र. 9359940543 यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!
Exit mobile version