Home नोकरी-करिअर सहकार विभागाच्या पद भरतीसाठी 14 व 16 ऑगस्ट रोजी होणार ऑनलाईन परिक्षा

सहकार विभागाच्या पद भरतीसाठी 14 व 16 ऑगस्ट रोजी होणार ऑनलाईन परिक्षा

Sarkari Naukari Bharati

(नंदुरबार) सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदांच्या भरतीसाठी 6 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या उमेदवारांची टी.सी.एस. कंपनीमार्फत 14 ऑगस्ट व 16 ऑगस्ट 2023 रोजी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. अशी माहिती सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांनी दिली आहे. (Online exam will be held on 14 and 16 August for the post of Cooperative Department)

परिक्षेबाबतच्या सूचना या संकेतस्थळावर आहेत प्रसिद्ध

परिक्षेच्या प्रवेशपत्राबाबतच्या सूचना उमेदवारांना त्यांनी अर्ज सादर करतेवेळी नोंदणी केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांवर व ई-मेल यावर पाठविण्यात आल्या आहेत. प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी सं स्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

परिक्षेस येतांना प्रवेशपत्राची रंगीत प्रत सोबत ठेवावी

वरील संकेतस्थळावरून उमेदवारांनी परिक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे, परिक्षेस येतांना प्रवेशपत्राची रंगीत प्रत सोबत ठेवावी. त्याचप्रमाणे प्रवेशपत्रात नमूद सुचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक भारती ठाकूर यांनी केले आहे.

Kotwal Bharati
Kotwal Bharati
error: Content is protected !!
Exit mobile version