Home तळोदा आमलाड येथील विद्यागौरव इंग्लिश मीडियम शाळेत जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

आमलाड येथील विद्यागौरव इंग्लिश मीडियम शाळेत जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

World Adivasi Day

(तळोदा) विद्यागौरव प्रायमरी, सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आमलाड,ता.तळोदा,जि.नंदुरबार येथे विश्व आदिवासी गौरव दिवस दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी ” जागतिक आदिवासी दिवस ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (World Adivasi Day celebrated in Vidya Gaurav English Medium School)

जागतिक आदिवासी दिवस : मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

सर्व प्रथम आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असल्याने सुरूवातीला वृक्ष दिंडी काढून संस्थापक अध्यक्ष श्री. अशोक तांबोळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर वृक्ष पूजन करून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक आदिवासी गीत गायन, आदिवासी नृत्य, आदिवासी साहित्य प्रदर्शन, आदिवासी संस्कृतीबाबत माहिती असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. 

World Adivasi Day

जागतिक आदिवासी दिवस : आदिवासी संस्कृती, समाज जीवन, वस्तुस्थिती व समाज सुधारणा याबाबत मार्गदर्शन

यावेळी प्रमुख अतिथी संस्थापक अध्यक्ष श्री.अशोक तांबोळी, पालक श्री.जगदीश वळवी, विश्वास पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.ललित पाठक सरांनी आदिवासी संस्कृती, समाज जीवन, आजची वस्तुस्थिती व समाजात काय सुधारणा आवश्यक आहे याबाबत मोलाचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थी व उपस्थित सर्व पालकांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण वसावे तर आभार प्रदर्शन अमरसिंग वळवी यांनी केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.पालकांनी यावेळी कार्यक्रमाबद्दल छान अभिप्राय दिले. कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय अशोकजी तांबोळी सरांची मोलाची उपस्थिती लाभली.

error: Content is protected !!
Exit mobile version