Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar has written to Union Road Transport Minister Nitin Gadkari demanding that the traffic congestion in Pune and the surrounding areas be resolved.

पत्रात म्हटले आहे की, पुणे महानगर आणि औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता #पुणे परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) – सध्या ४ लेनचा हा रस्ता ६ लेनमध्ये रुपांतरीत करावा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) – विद्यमान ४ लेनच्या रस्त्याचे ६ लेनमध्ये रूपांतर करावे, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) – सध्या २ लेन असलेला मार्ग ४ लेनचा करण्याची आवश्यकता आहे. या तिन्ही मार्गांवर #शिक्षणसंस्था, #औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालये, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला आहे.

या मार्गांवरील प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येची कमाल मर्यादा ओलांडली आहे. अशा परिस्थितीत या महामार्गावर तात्काळ लेन वाढवण्याचे काम करण्यात यावे, जेणेकरून येत्या काळात उभारल्या जाणाऱ्या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामासाठीही पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकेल – उपमुख्यमंत्री पवार

#वाहतूककोंडी

error: Content is protected !!
Exit mobile version