
अर्थसंकल्पामध्ये विदर्भासाठी करण्यात आलेल्या तरतुदींवर आधारित घडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर विभागीय माहिती संचालक कार्यालयाने याची निर्मिती केली आहे.
विदर्भातील कृषी, आरोग्य, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आदींबाबतच्या तरतुदींची माहिती वैविध्यपूर्ण ग्राफिक्सद्वारे यामध्ये आहे. विविध शासकीय कार्यालये आणि प्रसार माध्यमांसाठी ती संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.