
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आता तहसील किंवा जिल्हा कार्यालयात यावे लागणार नाही. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या “ग्रामसंवाद अभियान” मुळे अधिकारी थेट गावात येणार आहेत आणि गावपातळीवरच समस्या सोडवणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 जुलै 2025 रोजी महसूल आढावा बैठकीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
गावपातळीवर नागरिक व प्रशासन यांच्यातील संवाद अधिक बळकट करणे त्यांच्या समस्यांसाठी तालुका किंवा जिल्हा ठिकाणी येण्याची गरज भासणार नाही, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामीण भागातील शासकीय कार्यालये व यंत्रणा एकत्र येऊन नागरिकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण करतील.
उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी आठवड्यातून किमान दोन दुर्गम गावांना भेट द्यायच्या आहेत.
अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी गावात ऐकून घेऊन शक्य तितक्या समस्या तत्काळ सोडवाव्यात.
गावातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, बँका, पोस्ट ऑफिस, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी व ग्रामसेवक कार्यालय, कृषी सेवक, विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय, पतसंस्था, पशुवैद्यक अधिकारी इत्यादी ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली जाईल.
अभियानाचा दर महिन्याला महसूल आढावा बैठकीत सादर केला जाईल.
डॉ.मित्ताली सेठी यांचे प्रतिपादन
“ग्रामसंवाद अभियानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या गावपातळीवरच सोडवता येतील. यामुळे त्यांचा वेळ, खर्च वाचेल आणि प्रशासनावरचा विश्वास वाढेल. हे अभियान प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवेल.”
#ग्रामसंवादअभियान#Nandurbar#LokabhimukhPrashasan#CitizenCentricGovernance#डॉमित्तालीसेठी