Home महाराष्ट्र जिल्हा ग्रंथोत्सवाला आजपासून सुरवात

जिल्हा ग्रंथोत्सवाला आजपासून सुरवात

District Book Festival begins today

अमरावती: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे शनिवार दि. 28 मार्चपासून दोन दिवसांच्या अमरावती ग्रंथोत्सव – 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात होणार असून ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.

हा ग्रंथोत्सव शनिवार, दि. 28 ते रविवार, दि. 29 मार्च 2026 दोन दिवस चालणार आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन, विक्री तसेच साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी राहणार आहे. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनाला महापौर श्रीचंद तेजवानी उपस्थित राहतील. खासदार डॉ. अनिल बोंडे अध्यक्षस्थानी राहतील. खासदार बळवंत वानखेडे, अमर काळे, आमदार किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, उपस्थित राहतील. विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र उपस्थित राहतील.

ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर दुपारी एक ते अडीच वाजेपर्यंत ‘ज्ञानाच्या वाटेवर वाचन संस्कृतीचा पूर्ण जागर’ या परिसंवादाच्या आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाचे अध्यक्ष मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक अविनाश दुधे राहतील. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत प्रवीण तिखे हे ‘हास्याचे तिखे बोल’ कार्यक्रम सादर करतील.

ग्रंथोत्सवात दुसऱ्या दिवशी रविवार, दि. 29 मार्चला दुपारी 11 ते 2 वाजता या कालावधीत ‘ग्रंथाचा उत्सव, आरोग्याचा महोत्सव’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे राहतील. तसेच दुपारी 2 ते 4 या वेळेत कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.त्यानंतर दुपारी 4.30 वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येईल.

नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री आणि ग्रंथोत्सव समारंभाला भेट द्यावी, तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय सहायक संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावी यांनी केले आहे.

Chandrashekhar Bawankule

error: Content is protected !!
Exit mobile version