Home अक्कलकुवा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे भेट

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे भेट

2
District Collector Dr. Mittali Sethi visits Jawahar Navodaya Vidyalaya, Akkalkuva.

(अक्कलकुवा) मा. जिल्हाधिकारी तथा जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा यांच्या विद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे भेट देऊन विद्यालयाच्या विविध शैक्षणिक, निवासी व विद्यार्थी कल्याणाशी संबंधित उपक्रमांचा आढावा घेतला.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. व्ही. एम. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध वर्गांना भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थी वसतिगृहांची पाहणी करून स्वच्छता, शिस्त आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांशी विशेष संवाद साधत उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, विविध करिअरच्या संधी, ध्येय निश्चिती आणि सातत्यपूर्ण परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत भोजन करून भोजनाच्या गुणवत्तेची प्रत्यक्ष पाहणी केली. भोजनाची चव, पौष्टिकता आणि स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करत विद्यालयातील भोजन व्यवस्थेचे कौतुक केले.

विद्यालयातील उत्कृष्ट शिस्त, स्वच्छ व हिरवागार परिसर, सकारात्मक शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच भविष्यात पुन्हा विद्यालयाला भेट देण्याचे आश्वासन देत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीमुळे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा प्रशासनाचे सातत्यपूर्ण सहकार्य राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

#Nandurbar#DrMittaliSethi#JawaharNavodayaVidyalaya#Akkalkuwa#Education#StudentDevelopment#SchoolManagementCommittee#DistrictAdministration#QualityEducation#Maharashtra#NandurbarUpdates