Home तळोदा तळोदा प्रकल्पातील FLN शिक्षक प्रशिक्षणास जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट

तळोदा प्रकल्पातील FLN शिक्षक प्रशिक्षणास जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट

0
District Collector Dr. Mittali Sethi visits the FLN teacher training program under the Taloda project.

तळोदा: आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) विकसित करण्यासाठी देवी संस्थान, लखनऊ यांच्या सहकार्याने तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षकांसाठी दि. २७ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत ALfA (Accelerating Learning for All) शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

रयत संचलित अनुदानित आश्रमशाळा, नर्मदानगर येथे आयोजित या प्रशिक्षणात तळोदा प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील सुमारे ३०० शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

प्रशिक्षणास नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी (भा.प्र.से.) तसेच प्रकल्प अधिकारी सौ. लघिमा तिवारी (भा.प्र.से.) ,डॉ.पंकज पटले, भा.प्र.से. परिवेक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला. त्यांनी प्रशिक्षण सत्रांचे निरीक्षण करत शिक्षकांशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार, कृतीआधारित व विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पोहोचविण्यासाठी प्रशिक्षणातील संकल्पना प्रभावीपणे वर्गखोलीत राबविण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षणामध्ये Paired Learning, Random Pairing, Known to Unknown, Sound Blending, चित्राधारित वाचन तसेच Kinesthetic–Concrete–Abstract पद्धतीद्वारे गणित अध्यापनावर विशेष भर देण्यात आला. प्रात्यक्षिके, कृतीआधारित उपक्रम आणि Classroom Simulation द्वारे शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या गुणवत्तेत बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा सातत्याने अवलंब करावा, असे सांगितले. प्रकल्प अधिकारी सौ. लघिमा तिवारी यांनी FLN अभियानाची उद्दिष्टे प्रभावीपणे साध्य करण्यासाठी प्रशिक्षणातील ज्ञान प्रत्यक्ष अध्यापनात वापरण्यावर भर दिला.

यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) श्री. बी.आर. मुगळे व श्री. अरविंद वळवी उपस्थित होते.

देवी संस्थान, जिल्हा प्रशासन आणि प्रकल्प कार्यालय, तळोदा यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेला हा उपक्रम आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत भाषा व गणित कौशल्यांमध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

#डॉमित्तालीसेठी#Nandurbar#FLN#ALfA#Taloda#AshramSchool#QualityEducation#TribalDevelopment#EducationForAll#DistrictAdministration