Home महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांकडून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया, मत्स्य व्यवसायाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया, मत्स्य व्यवसायाची पाहणी

District Collector inspects chia seed production, food processing, and fishing industry

अमरावती: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज भातकुली तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी चिया सिड उत्पादन, अन्नप्रक्रिया उद्योग आणि मत्स्य व्यवसाय प्रकल्पांना भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्प उभारणीपासून ते होणाऱ्या फायद्याची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी रामा, ता. भातकुली येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अमोल पाठक यांनी उभारलेल्या दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगाला भेट दिली. यावेळी त्‍यांनी प्रकल्प निर्मिती, उत्पादन क्षमता, विस्तार, प्रकल्पापासून होणारे फायदे याबाबत माहिती घेतली. खवा, पनीर या व्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करावी, तसेच उद्योगाचा विस्तार करावा, उद्योगाला संस्थात्मक स्वरूप देऊन ब्रँडींगवर लक्ष देण्याची सूचना केली. तसेच शेतकऱ्यांना महाविस्तार – एआय मोबाईल अॅप्लीकेशनचा सक्रीय वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले

त्यानंतर टाकरखेडा, शंभु येथे आत्मा अंतर्गत 44 एकरमध्ये चिया सिडचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहे. यातील योगेश देशमुख यांच्या दोन एकरवरील चिया सिड लागवडीची श्री. येरेकर यांनी पाहणी केली. सदर उत्पादनापासून शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबत त्यांनी माहिती घेतली. चिया सिड लागवडीबद्दल जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. प्रत्यक्ष उत्पादनानंतर झालेल्या लाभाची माहिती देण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच कृषी मॅपर अॅपमध्ये पीक प्रात्यक्षिक तपशील माहिती ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच नांदगाव पेठ एमआयडीसीतील सावर्डी येथील ऑस्टेक प्रायव्हेट लिमिटेड या मत्स्य व्यवसाय प्रकल्पाची पाहणी केली.

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, दादासाहेब दराडे, तहसीलदार विजय लोखंडे, अक्षय मंडवे, तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले, प्रशांत गुल्हाने आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version