Home सरकारी योजना 7 एप्रिल रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

7 एप्रिल रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

District-level Democracy Day will be held on April 7th.

-मित्ताली सेठी

#नंदुरबार

जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून माहे एप्रिल 2025 महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर आणि पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कामासबंधी वैयक्तिक तक्रारी/निवेदन सादर करावयास असल्यास प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या लोकशाही दिनात दाखल कराव्यात.

तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल तक्रार/निवेदन यावर समाधान न झाल्यास प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार/निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000000

error: Content is protected !!
Exit mobile version