Home नंदुरबार जिल्हा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन

Divyang Fortnight program organized on the occasion of World Day of Disabled Persons

राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य तसेच अधिकारी-कर्मचारी संघ, जिल्हा शाखा-नंदुरबार यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने दिव्यांग पंधरवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी छत्रपती शिवाजी नाट्यगृह, नंदुरबार येथे भेट देऊन उपस्थित दिव्यांग नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिव्यांग व्यक्तींना उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, सुविधा व सहाय्याबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच दिव्यांग नागरिकांना येणाऱ्या अडचणी, समस्या आणि गरजांबाबत थेट संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेतले.

दिव्यांग पंधरवाडा कार्यक्रमामुळे दिव्यांग नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असून, त्यांच्या हक्कांविषयी आणि उपलब्ध सुविधांविषयी जनजागृती घडून आली. सामाजिक समावेशन आणि समान संधी देण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे.

(Collector Office Nandurbar)

#DivyangFortnight#InclusiveIndia#SocialJustice

error: Content is protected !!
Exit mobile version