Home आरोग्य गणोर गावात लंपी आजार प्रतिबंधासाठी प्रभावी फवारणी मोहिम

गणोर गावात लंपी आजार प्रतिबंधासाठी प्रभावी फवारणी मोहिम

ganor govat lampi aajar

शहादा तालुक्यातील अंबापुर पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी-२) कार्यक्षेत्र अंतर्गत मौजे गणोर येथे लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या. गावातील सर्व गोठ्यांमध्ये कीटकनाशक व गोचीड निर्मूलन फवारणी करून जनावरांचे संरक्षण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

या मोहिमेत सरपंच सौ. कविता राहुल रावताळे, सहायक पशुधन विकास अधिकारी श्री. अविनाश जयवंत वळवी, परिचर श्री. रोहित मालचे, ग्रामसेवक श्री. कुवरसींग नाईक तसेच गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.

लंपी आजाराचा धोका व कारणे:

गायवर्गीय जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग हा प्रामुख्याने डास, मच्छर, गोमाशी यांच्यामुळे पसरतो. हा संसर्ग जलद गतीने वाढतो व पशुधनाच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतो. त्यामुळे गाव पातळीवर नियमित फवारणी करून गोठ्यांमधील कीटकांचे नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे.

क्षेत्रीय आढावा व प्रतिबंधात्मक उपाययोजना:

डॉ. तुषार गीते यांनी क्षेत्रीय स्तरावर भेट देऊन लंपी आजाराच्या प्रादुर्भावाची पाहणी केली. त्यांनी औषधोपचार, लसीकरण, व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेत स्थानिकांना मार्गदर्शन केले.

या पार्श्वभूमीवर प्रभारी जिल्हा उपयुक्त पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. तुषार गीते यांनी ग्रामपंचायतींना आवाहन केले की –

1. गावातील सर्व गोठ्यांमध्ये कीटकनाशक फवारणी करावी.

2. पशुवैद्यकीय विभागाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार व लसीकरणाच्या उपाययोजना राबवाव्यात.

3. डास-मच्छर निर्मूलनासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा.

गणोर गावातील ग्रामस्थांनी गाव पातळीवर एकजुटीने केलेल्या सहकार्यामुळे ही फवारणी मोहीम यशस्वी ठरली. सामूहिक प्रयत्नातूनच लंपीसारख्या संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, हा संदेश यावेळी अधोरेखित झाला.

#LumpySkinDisease#nandurbar#animalhealth#CattleCare#PreventiveMeasures#pashusavardhan#shahada#Grampanchayat#lumpyfreevillage

error: Content is protected !!
Exit mobile version