महानुभाव पंथाच्या समस्या सोडविण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या ३८ व्या अधिवेशनात दिली.
सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी देशातील सामान्य माणसाला आध्यात्मिक दिशा दाखविण्यासोबतच समाजात समता स्थापन करण्याचा विचार दिला. त्यांनी आपल्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली, महानुभाव विचारांबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून रुजविण्याचे कामही केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ उपयुक्त ठरले, असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार भास्कर भगरे, आमदार प्रवीण तायडे, आमदार अमोल जावळे, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मोहन कारंजेकर बाबा, महंत सुकेणकर बाबा, महंत चिरडेबाबा, महंत कृष्णराज बाबा मराठे, प्रकाश नन्नावरे, दत्ता गायकवाड आदी उपस्थित होते.
