Home सरकारी योजना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा-...

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेली घाटांची कामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण करा- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

1
Ensure that the ongoing work on the ghats for the Simhastha Kumbh Mela is completed within the stipulated timeframe and meets quality standards – Kumbh Mela Minister Girish Mahajan.

नाशिक:  नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने जलसंपदा विभाग व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध घाट, रस्ते तसेच अनुषंगिक पायाभूत सुविधा विकसित करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे गुणवत्तापूर्ण आणि मार्च 2027 या विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन, तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक रविवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॅा. डी. एस. स्वामी, जलसंपदाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिकचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. महाजन यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेले विविध घाटांची कामाची सद्यस्थिती जाणून घेतली.  या कामांची अद्ययावत प्रगती, अंमलबजावणीतील अडचणी, आवश्यक विभागीय समन्वय तसेच प्रलंबित बाबींचा आढावा मंत्री श्री. महाजन यांनी घेतला. ही कामे मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या.