Home नंदुरबार जिल्हा ‘प्रकाश वाटा’ उपक्रमांतर्गत प्रवेश परीक्षा यशस्वी; विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी नवी दिशा

‘प्रकाश वाटा’ उपक्रमांतर्गत प्रवेश परीक्षा यशस्वी; विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी नवी दिशा

Entrance exam under 'Prakash Wata' initiative successful; New direction for students for competitive exams

नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या ‘प्रकाश वाटा’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत आज प्रवेश परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

या उपक्रमाद्वारे दुर्गम व आदिवासी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना IIT-JEE व NEET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्ह्यातील विविध केंद्रांवर घेण्यात आलेल्या या परीक्षेस उत्स्फूर्तपणे़ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन, वैद्यकीय सेवा व भरारी पथकांची योग्य व्यवस्था करण्यात आली होती.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी स्वतः परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली व व्यवस्थेची खात्री केली. त्यांच्यासोबत सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संगवी, पीओ चंद्रकांत पवार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

परीक्षा केंद्रे

• डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार

• श्रीमती. डी.आर. हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार

• नेमसुशील माध्यमिक विद्या मंदिर, तळोदा

• न्यू हायस्कूल, तळोदा

• शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा.

‘प्रकाश वाटा’ हा उपक्रम ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भवितव्याची दारे उघडणारा ठरत असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.

.

#PrakashWata#Nandurbar#EducationForAll#IITJEE#NEET#TribalStudents#GovernmentInitiative#BrightFuture#Maharashtra#StudentSuccess

error: Content is protected !!
Exit mobile version