
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (एसआयएसी) मुंबई येथे अभिरूप मुलाखत कार्यक्रम तसेच क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा घेण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२५ पूर्वी siac.cet2025@gmail.com या ईमेलवर अर्ज पाठवावेत. विद्यार्थ्यांनी मुलाखत कार्यक्रम नोंदणीकरिता www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनेचे अवलोकन करावे. तसेच ०२२-२२०७०९४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या क्वालिटी एनरिचमेंट प्रोग्राम तसेच निःशुल्क अभिरूप मुलाखत कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.