Home नंदुरबार आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत यांनी नंदुरबार शहरातील विवीध समाजांच्या सभागृहांसाठी, व मंदीरांसाठी...

आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत यांनी नंदुरबार शहरातील विवीध समाजांच्या सभागृहांसाठी, व मंदीरांसाठी मंजुर केलेला शासकीय निधी त्यांचेच बनावट लेटरहेड तयार

1
Government funds sanctioned by MLA Dr. Vijaykumar Gavit for community halls and temples belonging to various communities in Nandurbar city were misappropriated using forged letterheads in his name.

नंदुरबार(प्रतिनिधी):-आ.डॉ. विजयकुमार गावीत यांच्या नंदुरबार शहर भाजपा कार्यालयीन प्रमुख म्हणून काम पाहणारे अशोक शिवाजी बेहेरे, रा. नंदुरबार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाच्या चौकशी वरुन नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुरनं 665/ 2026 भा.न्या.सं. 2023 चे कलम 61,318 (2), 318 (4),336 (2), 336(3), 336(4), 337,339, 340 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याची हकीकत या प्रमाणे की, आमदार डॉक्टर विजयकुमार गावीत यांनी आदिवासी विकास मंत्री म्हणुन 2022 2024 च्या दरम्यान महाराष्ट्र शासनास शिफारस करुन नंदुरबार नगरपरिषद क्षेत्रातील विवीध कामांसाठी 1) शासन निर्णय क्रमांक नपावै- 2023/प्र.क्र .328 (98)/नवि- 16 मंत्रालय मुंबई दिनांक 19 जानेवारी 2024 अन्वये 05 कामे 10 कोटी, 2) शासन निर्णय क्रमांक नपावै-5023/प्र.क्र.765 (24)/नवि-16 (ई- 683263) मंत्रालय मुंबई दिनांक 21 जुन 2024, अन्वये 10 कामे 15 कोटी, 3) शासन निर्णय क्रमांक नपावै-2023/प्र.क्र.238 (47)/नवि-16 (ई- 823509) मंत्रालय मुंबई दिनांक 23 ऑगस्ट 2024 अन्वये 12 कामे 9.50 कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन घेतला होता. आ.डॉ. विजयकुमार गावीत हे मध्यंतरी काळात आजारी असतांना 1) माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, 2) गौरव प्रकाश चौधरी, 3) नयन दिलीप चौधरी, सर्व रा. नंदुरबार, 4) अकाउंटंट किशोर तुळशिराम पाटील रा. रनाळे व इतर अज्ञात इसम यांनी गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचुन दिनांक 18/8/2025 ते दिनांक 2/4/2026 रोजीच्या दरम्यान  विजयकुमार गावीत विधानसभा सदस्य नंदुरबार यांचे नावाचे दिनांक 18/8/2025, दिनांक 15/11/2025, दिनांक 5/1/2026 रोजीचे 2 असे एकुण 4 बनावट लेटरहेड नंदुरबार शहरातील शिरीष चौधरी यांचे कार्यालयात तयार करुन त्यावर विजयकुमार गावीत यांची बनावट सही करुन मंत्रालयात सादर केले. त्यामुळे दिनांक 19/1/2024, दिनांक 21/6/2024, दिनांक 23/ 8/2024 चे मुळ शासन निर्णयात शुद्धीपत्रकाव्दारे बदल करुन एकुण 9 कोटी रुपये नंदुरबार शहरातील वेगळ्याच कामांसाठी महाराष्ट्र शासनाची दिशाभुल करुन स्वतःच्या आर्थिक व राजकीय फायद्यासाठी वर्ग करुन घेतला होता. वर्ग करण्यात आलेल्या निधीत 2 कोटी रुपयांची कामे ही माजी आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांचे वडील कै. हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या नावाने स्मृती उद्यान व सभागृह साठी सुद्धा प्रस्तावीत करण्यात आल्याचे दिसुन आले आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाणे तसेच इतर पोलीस ठाण्याचे खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दंगा, सार्वजनीक मालमत्तचे नकुसान करणे, असे प्रकारचे एकुण 16 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांचे साथीदार गौरव प्रकाश चौधरी, नयन दिलीप चौधरी यांच्यावर देखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहे. तसेच नयन दिलीप चौधरी यास नंदुरबार जिल्हा हद्दीतुन हद्दपार करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदीप भटु पाटील हे करीत आहे. सध्या या प्रकरणातील आरोपीतांचा शोध सुरु आहे.