(नंदुरबार) जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील डोंगराळ आणि अत्यंत दुर्गम परिसरात शासनाच्या सेवांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘प्रकल्प दिशा — दुर्गम गावांमधील मूलभूत मानव विकास प्रकल्प’ या अभिनव उपक्रमांतर्गत चुलवड (ता. अक्राणी) येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले.
उद्देश — नागरिकांच्या दारी शासन सेवा
अक्राणी तालुक्यातील नागरिकांना भौगोलिक अडचणी, वाहतूक मर्यादा आणि आर्थिक परिस्थितीमुळे शासन सेवांचा लाभ घेण्यात अनेकदा अडचणी येतात. ‘प्रकल्प दिशा’च्या माध्यमातून आता या सेवांचा थेट लाभ नागरिकांना त्यांच्या गावातच मिळणार आहे.
चुलवड शिबिरात दिलेल्या सेवा:
३० सप्टेंबर रोजी चुलवड येथे आयोजित या शिबिरात विविध विभागांनी एकत्र येऊन एकाच ठिकाणी नागरिकांना जन्म, मृत्यू, जात व उत्पन्न प्रमाणपत्र, रेशनकार्ड, विवाह प्रमाणपत्र, नमुना ८ दाखला, पीएम किसान, महाडीबीटी, संजय गांधी योजना, आधार नोंदणी व दुरुस्ती, बँक खाते उघडणी, सिकल सेल तपासणी, आरोग्य तपासणी, रक्त नमुना, गर्भवती महिला, HR माता, स्तनदा माता तपासणी, ANC, SAM तपासणी, पोषण व आरोग्य सल्ला, कृषी विभागाचे ‘अॅग्रीस्टॅक’ व ‘महा विस्तार ए.आय’ इ. सेवांचा लाभ दिला.
या शिबिरात अधिकाधिक सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवल्या गेल्या, आणि शेकडो नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
विभागीय समन्वय — सर्वसमावेशक अंमलबजावणी:
कार्यक्रमास अक्राणीचे तहसीलदार श्री. ज्ञानेश्वर सपकाळे तसेच अक्राणी तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. मनोज भोसले उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला.
महसूल, ग्रामविकास, आरोग्य, कृषी, महिला व बाल विकास, बँकिंग आदी विभागांच्या एकत्र प्रयत्नांमुळे सेवा वितरण प्रक्रिया अधिक प्रभावी व पारदर्शक झाली आहे.
‘प्रकल्प दिशा’मुळे अक्राणी तालुक्यातील दुर्गम गावांतील नागरिकांना शासकीय सेवा ‘गावातच, वेळेत आणि पारदर्शकपणे’ उपलब्ध होत आहेत. ‘सेवा तुमच्या दारी – समान विकासाची जबाबदारी’ या संकल्पनेची पूर्तता या उपक्रमातून होत आहे.
#प्रकल्पदिशा#नंदुरबार#अक्राणी#CollectorOfficeNandurbar#TribalDevelopment#AkraniTaluka#Chulwad#PublicServiceDelivery