Home अक्कलकुवा भांगरापाणी येथे भव्य शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद!

भांगरापाणी येथे भव्य शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद!

Grand farmer-scientist interaction at Bhangrapani!

धुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेळीपालन अधिक फायदेशीर!

#भांगरापाणी, #अक्कलकुवा (जि. #नंदुरबार) येथे पार पडलेल्या एक दिवसीय शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद व शास्त्रीय शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रमास शेळीपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हा कार्यक्रम महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ व पशुसंवर्धन विभाग, नंदुरबार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

प्रमुख मार्गदर्शकांचे विचार:

डॉ. अनिल भिकाने (संचालक, विस्तार शिक्षण, माफसू, नागपूर) –

“सातपुडा परिसरातील आदिवासी शेळीपालकांनी शास्त्रीय पद्धतीने शेळीपालन करावे. योग्य पैदास धोरण, संतुलित आहार व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अधिक उत्पादन व नफा मिळू शकतो.”

डॉ. सुखदेव बारबुधे (संचालक, राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैदराबाद)

“उत्कृष्ट बोकडांची पैदास करून मूल्यवर्धित मांस उत्पादने तयार करावीत. यामुळे शेळीपालकांना जास्त फायदा होईल. आमच्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल.”

कार्यक्रमातील ठळक वैशिष्ट्ये:

330+ आदिवासी महिला व पुरुष शेळीपालकांचा सहभाग!

शेळीपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, पैदास धोरण, आहार व्यवस्थापन, आरोग्य संरक्षण यावर सखोल मार्गदर्शन!

पारंपरिक आदिवासी होळी नृत्याची बहार!

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. धैर्यशीलराजे पडवळ, डॉ. विकास पाटील, डॉ. जागृत पाटील, डॉ. महेश धस, डॉ. निलेश जोगदंड, डॉ. अजय मोळके, तसेच विद्यार्थी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी यांनी विशेष मेहनत घेतली.

शेळीपालकांनी आधुनिक तंत्रज्ञान व शास्त्रशुद्ध पद्धतींचा अवलंब करून व्यवसाय अधिक फायदेशीर करावा!

#शेळीपालन#GoatFarming#OrganicFarming#FarmersFirst

#AgricultureTech#रोजगारसंधी#ग्रामविकास#AnimalHusbandry

#महाराष्ट्रशेळीपालन#शेतीउद्योग#शेळीपालन_संधी#SelfEmployment

error: Content is protected !!
Exit mobile version