नवी दिल्ली: राष्ट्रमाता जिजाऊ तथा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे,सहाकय निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, उपअभियंता किरण चौधरी तसेच महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मातृत्वपूर्ण कार्याचा व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आणि राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या प्रेरणादायी योगदानाचा सर्वांना परिचय करून दिला.
0000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्तविशेष -12/ दि.12.01.2026
एक्सवरआम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMic, https://x.com/micnewdelhi, https://x.com/MahaMicHindi
