Hearing held on 206 claims at the District-level Forest Rights Committee meeting.
(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय वनहक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत एकूण २०६ वनहक्क दाव्यांवर सविस्तर सुनावणी घेण्यात आली. प्रत्येक दाव्याचा नियमानुसार व वस्तुनिष्ठ पद्धतीने आढावा घेत संबंधित बाबींवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस उपवनसंरक्षक, नंदुरबार तसेच प्रकल्प अधिकारी, नंदुरबार उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी दाव्यांबाबत आवश्यक माहिती सादर करत समितीसमोर वस्तुस्थिती मांडली.
वनहक्क प्रकरणांचा पारदर्शक, न्याय्य व वेळेत निपटारा करण्याच्या दृष्टीने समितीने आवश्यक निर्देश दिले असून पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार न्याय मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.