Home नंदुरबार जिल्हा जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत २०६ दाव्यांवर सुनावणी

जिल्हास्तरीय वनहक्क समितीच्या बैठकीत २०६ दाव्यांवर सुनावणी

1
Hearing held on 206 claims at the District-level Forest Rights Committee meeting.

(नंदुरबार) मा. जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय वनहक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली.

📋 बैठकीत एकूण २०६ वनहक्क दाव्यांवर सविस्तर सुनावणी घेण्यात आली. प्रत्येक दाव्याचा नियमानुसार व वस्तुनिष्ठ पद्धतीने आढावा घेत संबंधित बाबींवर चर्चा करण्यात आली.

🤝 बैठकीस उपवनसंरक्षक, नंदुरबार तसेच प्रकल्प अधिकारी, नंदुरबार उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी दाव्यांबाबत आवश्यक माहिती सादर करत समितीसमोर वस्तुस्थिती मांडली.

✅ वनहक्क प्रकरणांचा पारदर्शक, न्याय्य व वेळेत निपटारा करण्याच्या दृष्टीने समितीने आवश्यक निर्देश दिले असून पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार न्याय मिळावा यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

#Nandurbar#ForestRights#वनहक्क#DistrictAdministration#CollectorOffice#डॉ_मित्ताली_सेठी#GoodGovernance#MaharashtraGovernment#PublicAdministration