विज्ञापित

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

(नंदुरबार) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहादा ते धडगाव रस्त्यावर तलावडी शिवार व उपनदेव फाट्या जवळ धाड टाकून 59 लाख 80 हजार रुपये किमतीचा अवैध गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. या धडक कारवाईत दोन महिंद्रा बोलेरो वाहने जप्त करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक चालक फरार झाला आहे, […]
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक
Illegal stock of Goa liquor worth ₹59 lakh seized on Shahada-Dhadgaon road; one person arrested along with two Bolero vehicles.

(नंदुरबार) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहादा ते धडगाव रस्त्यावर तलावडी शिवार व उपनदेव फाट्या जवळ धाड टाकून 59 लाख 80 हजार रुपये किमतीचा अवैध गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त केला आहे. या धडक कारवाईत दोन महिंद्रा बोलेरो वाहने जप्त करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक चालक फरार झाला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक निरिक्षक व्ही. ए. चौरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

विज्ञापित

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

गुप्त माहितीनुसार, शहादा ते धडगाव रस्त्यावरून गोवा निर्मित मद्यसाठ्याची अवैध वाहतूक होणार असल्याची बातमी राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे दुय्यम निरीक्षक एस. एस. गोयेकर (भरारी पथक) व दुय्यम निरीक्षक अ. शां. गायकवाड (बीट क्र. 02) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तलावडी शिवार व उपनदेव फाट्याजवळ (दरा शिवार) सापळा रचला. संशयितरीत्या येणाऱ्या दोन महिंद्रा बोलेरो वाहनांना (एक वाहन क्र. एमएच-05-बीडी-507 व एक विना नंबर प्लेट) अडवून तपासणी केली असता, त्यात अवैध गोवा बनावटीच्या ‘रॉयल ब्लू मार्ट व्हिस्की’ चे 180 मि.ली. क्षमतेचे एकूण 470 बॉक्स लपवून ठेवल्याचे आढळले.

कारवाईचा संक्षिप्त तपशील:

• जप्त मुद्देमाल: रॉयल ब्लू मार्ट व्हिस्की (470 बॉक्स) व 02 महिंद्रा बोलेरो वाहने

• एकूण किंमत: रु. 59 लाख 80 हजार.

• अटक आरोपी: विनोद फुलजी मोरे (वय 30 वर्ष, रा. करणपुरा, ता. पानसेमल, जि. बडवाणी, मध्य प्रदेश)

• फरार आरोपी: दुसऱ्या वाहनाचा चालक (शोध सुरू)

• दाखल गुन्हे: महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई), 80, 81, 83, 98 (2), 108 अंतर्गत कारवाई.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथक

सदर कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त (दक्षता व अंमलबजावणी) पी. पी. सुर्वे, नाशिक विभागाच्या उप आयुक्त श्रीमती यु. आर. वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व नंदुरबारचे प्रभारी अधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या कारवाईत निरीक्षक व्ही. ए. चौरे, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोयेकर, अ. शां. गायकवाड, पी. व्ही. मोरे, एच. पी. घरटे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक व जवानांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. गोयेकर व अ. शां. गायकवाड करत आहेत.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: