“शहादा येथे तृतीयपंथीयांसाठी जाणीव जागृती कार्यशाळा”

शहादा येथे पंचायत समिती आणि समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय (नंदुरबार) यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय घटकांसाठी एका विशेष जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
“शहादा येथे तृतीयपंथीयांसाठी जाणीव जागृती कार्यशाळा”
Awareness workshop for transgender people in Shahada

कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी विविध अधिकाऱ्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजना, घरकुल योजना आणि १३ मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘बीज भांडवल योजने’ अंतर्गत मिळणाऱ्या कर्जाच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला अनेक प्रशासकीय अधिकारी, अशासकीय सदस्य आणि तृतीयपंथीय समुदायातील गौरी गुरु आरती नायक, गोपी जान, सनम जान यांच्यासह अनेक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: