वनवासी विद्यालयात राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा

(नंदुरबार) वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात आला.यावेळी मंगेश देवरे यांनी विद्यार्थ्यांकडून कागदापासून चंद्रयान तीनच्या प्रतिकृती तयार करुन घेतल्या. संदीप आहेर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त २०२६- २७ या वर्षाची थीम : विकसित भारतच्या दिशेने: नावीन्य, सहकार्य आणि जागतिक अंतराळ नेतृत्वाची आस याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य प्रमोद चिंचोले, पर्यवेक्षक प्रेमल पाडवी, ज्येष्ठ शिक्षक गायकवाड, भारत झाल्टे, प्रदिप देसले, देवेंद्र साळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाडवी यांनी केले.
वनवासी विद्यालयात राष्ट्रीय अवकाश दिवस साजरा
National Space Day Celebrated with Enthusiasm at Vanvasi Vidyalaya, Nandurbar

दुपार सत्रात कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा.रामकृष्ण सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक अवकाश दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिलीप गावीत यांनी केले. प्रास्ताविक विज्ञान शिक्षक संदिप आहेर यांनी करीत कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. कनिष्ठ महाविद्यालयात पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले. यात १५ विद्यार्थ्यांनी पोस्टर सादर केली. दिलीप गावीत, संदिप आहेर यांनी बराच वेळ परिक्षण केले. प्रथम क्रमांक- भुमी दलपत गावीत (१२ वी विज्ञान), द्वितीय क्रमांक-मयुरी फुलसिंग वसावे (१२ वी विज्ञान), तृतीय क्रमांक-आयुष संदिप वळवी (१२ वी कला). तसेच विद्यार्थी कृती नाईक, भुमी गावीत, कस्तुरी वसावे, रोशनी गावीत व प्राचार्य प्रमोद चिंचोले यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज साधला. प्रमुख वक्ते प्रा.संदिप साळुंके यांनी अवकाश दिनाचे महत्त्व सांगितले. आभार प्रा.रणजीत सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.शुभम परदेशी, प्रितम वसावे व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: