Home सहकार चळवळ अधिक गतिमान करून या चळवळीत ग्रामीण भागातील शेवटचा घटक सहभागी झाला पाहिजे

सहकार चळवळ अधिक गतिमान करून या चळवळीत ग्रामीण भागातील शेवटचा घटक सहभागी झाला पाहिजे

या दृष्टीने सहकार विभागाने सुयोग्य नियोजन करावे व त्यानुसर कार्यवाही करावी, अशा सूचना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिल्या.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन येथे सहकार विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहकार आयुक्त दीपक तावरे,अपर आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, संतोष पाटील यांच्यासह सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Home अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाला गती!

अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाला गती!

आज नवी दिल्ली येथील शास्त्री भवनात, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री व रावेर लोकसभा खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी NHAI अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. 🏛️

🌍 महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा व उत्तर महाराष्ट्रातील #नंदुरबार, #धुळे, #जळगांव जिल्ह्यांसाठी वरदान ठरणाऱ्या अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग हा वाहतुकीसाठी तसेच कृषी आणि व्यापार क्षेत्रासाठी क्रांतिकारी ठरणार आहे. 🚛

💡 प्रकल्पाच्या गतीसाठी घेतलेले निर्णय…

✅ डिझाईनच्या अंतिम टप्प्यास गती देण्याचा निर्देश

✅ शेतकऱ्यांना जमिनीच्या भरपाईसाठी तत्काळ कार्यवाही

✅ महामार्गामुळे केळी क्लस्टर आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळणार

🏗️ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे!

⚡ शेती, व्यापार आणि विकासासाठी नवे दार उघडणार! 🚜📈

#राष्ट्रीयमहामार्ग#विकसनशीलमहाराष्ट्र#अंकलेश्वर_बुरहानपूरमहामार्ग#रक्षा_खडसे#शेतीतेविकास#वाहतुकीसाठीनवेयुग#NHAI#RoadToProgress#HighwayDevelopment#InfrastructureGrowth#KisanVikas#AtmanirbharBharat#JalgaonDevelopment#BurhanpurHighway#NHdevelopment

Home पाठ्यपुस्तक वितरण व शाळा पूर्वतयारीचा आढावा – नवापूर तालुका

पाठ्यपुस्तक वितरण व शाळा पूर्वतयारीचा आढावा – नवापूर तालुका

नंदुरबार जिल्ह्यातील शाळा पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्रात प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांनी अचानक भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

मुख्याध्यापकांसोबत बैठक घेऊन…

✅ शाळा पूर्वतयारीबाबत चर्चा

✅ शाळा प्रवेशोत्सवाचे नियोजन

✅ गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अपेक्षित कृती

या उपक्रमामुळे शाळा सुरु होण्याआधीच तयारीला गती मिळाली असून, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.

🎒 “सर्वांना शिक्षण, सुसज्ज तयारी!”

#ZPNandurbar#SchoolReady#TextbookDistribution#शाळा_प्रवेश_उत्सव#PrimaryEducation#NandurbarEducation#नवापूर#ZillaParishadSchools

Home महत्त्वाची हवामान सूचना – नागरिकांनी सतर्क राहावे!

महत्त्वाची हवामान सूचना – नागरिकांनी सतर्क राहावे!

सूचना जारीकर्ते: महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA)

🌩️ पुढील ३ तासांत नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे.

📌 सावधगिरीचे उपाय:

🔹 घराबाहेर पडणे टाळा

🔹 मोठ्या झाडांखाली उभं राहू नका

🔹 वीजेच्या तारा, खांबांपासून दूर रहा

🔹 शेतकरी व वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी

🙏 सर्व नागरिकांनी यासंदर्भात योग्य खबरदारी घ्यावी

#WeatherAlert#NandurbarWeather#Monsoon2025#StaySafe#MahaSDMA#वादळसावधान#NandurbarCares

Home व्यसनमुक्त जीवन = सशक्त समाज!

व्यसनमुक्त जीवन = सशक्त समाज!

चला, व्यसनांना “नाही” म्हणूया आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करूया!

स्वतःला सशक्त बनवा, तरुणांना प्रेरित करा आणि समाजात सकारात्मक बदल घडवा.

‘होकार आरोग्याला, नकार व्यसनाला!’

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार

#NandurbarAgainstDrugs#जनजागृती#SocialAwareness

Home नंदुरबार जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) शिबिरांना सुरुवात – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष उपक्रम

नंदुरबार जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) शिबिरांना सुरुवात – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष उपक्रम

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक व वेळेवर कर्ज मिळावे यासाठी नंदुरबार जिल्ह्यात किसान क्रेडिट कार्ड (KCC) शिबिरांना आजपासून सुरुवात झाली आहे. ७ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२५ दरम्यान निवडक ग्रामपंचायतींमध्ये दररोज शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

या उपक्रमात किसान क्रेडिट कार्डचे मंजुरीकरण आणि नूतनीकरण हे जिल्हा प्रशासन व बँकांसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.

आज दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणारी शिबिरे:

✅ जमाना ग्रामपंचायत – बँक ऑफ महाराष्ट्र, मोलगी शाखा

✅ कौली ग्रामपंचायत – बँक ऑफ महाराष्ट्र, कोराई शाखा

✅ मणिबेली ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खापर शाखा

✅ राजमोही एम ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, वाण्याविहीर शाखा

✅ खर्डा ग्रामपंचायत – स्टेट बँक ऑफ इंडिया, अक्राणी शाखा

✅ इच्छागव्हाण ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, तळोदा शाखा

✅ काजीपूर ग्रामपंचायत – बँक ऑफ बडोदा, तळोदा शाखा

✅ मालदा ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बोरड शाखा

✅ नवागाव ग्रामपंचायत – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रतापपूर शाखा

किसान क्रेडिट कार्ड (KCC) म्हणजे काय?

किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी, नंतरच्या प्रक्रिया, विपणन, उपजीविकेच्या गरजा व गुंतवणुकीसाठी योग्य आणि वेळेवर कर्ज मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे.

🎯 उद्दिष्टे:

1. पीक लागवडीसाठी अल्पमुदतीचे कर्ज

2. कापणी नंतरचे खर्च

3. उत्पादन विक्रीसाठी विपणन कर्ज

4. शेतकरी कुटुंबासाठी उपभोग गरजा

5. शेतीपूरक उपक्रमासाठी भांडवली खर्च

6. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कर्ज

व्यवहारासाठी माध्यम:

शेतकरी त्यांच्या किसान क्रेडिट कार्डचा वापर खालील माध्यमांद्वारे करू शकतात:

⦁ ATM किंवा मायक्रो ATM मधून पैसे काढता येतील.

⦁ बँकेचे प्रतिनिधी (BC) किंवा विक्रेत्यांकडील मशीनद्वारे व्यवहार करता येतील.

⦁ मोबाईल बँकिंग आणि IVR कॉलच्या माध्यमातून पैसे तपासता किंवा व्यवहार करता येतील.

⦁ आधार कार्डाशी जोडलेले कार्ड असल्यास, बायोमेट्रिकद्वारे व्यवहार शक्य आहे.

पात्रता (Eligibility):

या योजनेचा लाभ खालील प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळू शकतो:

⦁ स्वतःची शेती करणारे वैयक्तिक किंवा संयुक्त शेतकरी.

⦁ तोंडी भाडे कराराने किंवा वाटेकरी पद्धतीने शेती करणारे शेतकरी.

⦁ शेतकऱ्यांचे गट (SHG किंवा JLG) ज्यामध्ये भाडेकरू व वाटेकरी देखील असू शकतात.

आवश्यक कागदपत्रे:

1. २ पासपोर्ट साईज फोटो

2. ओळखपत्र (आधार, PAN, DL, Voter ID)

3. पत्त्याचा पुरावा

4. महसूल विभागाचा जमीनधारणाचा पुरावा

सूचना:

या शिबिरांमध्ये किसान क्रेडिट कार्डचे मंजुरी/नूतनीकरण प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात येतील. शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

#किसान_क्रेडिट_कार्ड#KCC2025#शेतकरी_हित#नंदुरबार_जिल्हा#कृषीविकास#कर्ज_सहाय्य#AgriSupport#districtnandurbar#BankingForFarmers#FinancialInclusion

Home नंदुरबार जिल्हा रुग्णालयात Brain Health Clinic चे उद्घाटन

नंदुरबार जिल्हा रुग्णालयात Brain Health Clinic चे उद्घाटन

(नंदुरबार) नीती आयोग व शासन संचलित IHBAS (Institute of Human Behaviour and Allied Sciences) यांच्या सहयोगाने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय येथे Brain Health Clinic – मेंदू आरोग्य क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.

या क्लिनिकचे उद्घाटन मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती. कल्पना ठुबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच वैद्यकीय अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या क्लिनिक अंतर्गत मेंदूचा सर्वांगीण विकास, मानसिक आरोग्य संवर्धन, तसेच विविध मेंदूविषयक आजारांवर निदान, उपचार आणि थेरपी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपचार सेवा दि. २ ऑक्टोबर २०२५ पासून नागरिकांसाठी सुरू होणार आहेत.

हा प्रकल्प राज्यात फक्त नंदुरबार जिल्ह्यात आणि देशभरातील निवडक १२ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असून, याचे एकत्रित उद्घाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोग श्री. B.V.R. सुब्रह्मण्यम यांच्या हस्ते VC द्वारे करण्यात आले.

या उपक्रमामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक Brain Health सेवा उपलब्ध होणार असून, मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढीस मोठी चालना मिळणार आहे.

#BrainHealthInitiative#NITIआयोग#nandurbar#BrainHealthClinic#DistrictHospital#healthcare#NandurbarUpdates

Home नंदुरबार : ‘प्रकाशवाटा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची शासकीय आश्रम शाळांना भेट

नंदुरबार : ‘प्रकाशवाटा’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची शासकीय आश्रम शाळांना भेट

(नंदुरबार) जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (भा.प्र.से.) यांनी प्रकाशवाटा उपक्रम अंतर्गत निवड करण्यात आलेल्या शासकीय आश्रम शाळांची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी शाळेतील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांच्या निवास व भोजन व्यवस्था तसेच अध्यापनाच्या गुणवत्तेचा सखोल आढावा घेतला.

मा. जिल्हाधिकारी यांनी खालील शाळांना भेट दिली –

1️⃣ शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, नंदुरबार

2️⃣ शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा, कोठली (ता. नंदुरबार)

3️⃣ शासकीय पोस्ट बेसिक शाळा, ढोंगसागाळी (ता. नवापूर)

भेटीदरम्यान डॉ. मित्ताली सेठी यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या वर्गखोल्या, वस्तीगृह, भोजनालय, लायब्ररी व विज्ञान प्रयोगशाळांची पाहणी केली. त्यांनी विशेषतः विद्यार्थ्यांसाठी अध्ययन-अध्यापनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

शासकीय आश्रम शाळा ढोंगसागाळी येथे सुरु असलेल्या नवीन वस्तीगृह इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून इमारत हस्तांतरणासंबंधी माहिती घेतली.

मा. जिल्हाधिकारी यांनी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना शालेय परिसर स्वच्छ, सुटसुटीत व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच शाळेत उपलब्ध असणाऱ्या विज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणांचा विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी पूर्णतः वापर करण्याचे निर्देश दिले.

‘प्रकाशवाटा’ हा जिल्हा प्रशासनाचा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, आत्मविश्वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला असून, या पाहणीद्वारे त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला.

#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#Prakashwata#EducationForAll#NandurbarDistrict#TribalEducation#AshramSchool#StudentDevelopment#InnovationInEducation#DistrictAdministration#SmartNandurbar#DigitalEducation#SchoolVisit#EducationReform#WomenLeadership#InspiringGovernance#VikasachiPrakashwata

Home जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नंदुरबारमध्ये होमगार्ड दलाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व शपथ ग्रहण कार्यक्रम

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त नंदुरबारमध्ये होमगार्ड दलाचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व शपथ ग्रहण कार्यक्रम

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नंदुरबार यांच्या वतीने होमगार्ड दलासाठी आपत्ती व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण व शपथग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश — आपत्ती पूर्वतयारी, जोखमीचे नियोजन आणि आपत्ती सौम्यीकरणात समुदाय सहभाग वाढविणे — हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात ‘आपत्ती व्यवस्थापन प्रतिज्ञा’ वाचनाने झाली. उपस्थितांनी एकमुखाने पुढील प्रतिज्ञा घेतली:

‘मी प्रतिज्ञा करतो/करते की शासनाच्या आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून, आपत्तीपासून माझ्या परिवाराची, समाजाची व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याचे ज्ञान प्राप्त करीन; समुदाय आधारित उपक्रमांत सहभाग घेईन; आणि राज्यातील आपत्तीप्रवण भागात जीवित, वित्त व पर्यावरण हानी होऊ नये म्हणून सदैव कटिबद्ध राहीन.’

कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे आणि मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृतीचा संदेश दिला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. वसंत बोरसे यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाची रचना, प्रतिसाद यंत्रणा, आणि होमगार्ड दलाची जबाबदारी याविषयी सविस्तर माहिती दिली.

श्री. पावभा छगन मराठे (प्रभारी तालुका समादेशक, होमगार्ड पथक, नंदुरबार) यांनी होमगार्ड दलाच्या भूमिकेबद्दल प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सत्रात मास्टर ट्रेनर (आपत्ती व्यवस्थापन) श्री. डी. डी. साळुंखे, मुख्याध्यापक, नंदुरबार यांनी आपत्तीपूर्व तयारी, आपत्कालीन प्रथमोपचार, बचाव तंत्र आणि समुदाय प्रतिसाद व्यवस्थेवर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील होमगार्ड दल अधिक सज्ज, संवेदनशील आणि आपत्ती व्यवस्थापनात सक्षम झाले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेऊन ‘आपत्ती सज्ज जिल्हा’ निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे सर्व वक्त्यांनी अधोरेखित केले.

#जागतिकआपत्तीधोकेनिवारणदिन#आपत्तीनियंत्रण#आपत्तीव्यवस्थापन#Nandurbar#DisasterManagement#HomeGuards#Resilience#CommunitySafety#DDMA#DrMittaliSethi#shravandatt

Home नंदुरबार जिल्ह्यात महिला आरक्षण सोडत पार — पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पारदर्शक प्रक्रिया

नंदुरबार जिल्ह्यात महिला आरक्षण सोडत पार — पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पारदर्शक प्रक्रिया

जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत पार पडली.

नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ५६ निवडणूक विभागांपैकी आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीसाठी १ जागा, अनुसूचित जमातीसाठी ४४ जागा आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी ११ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

🔹 महिला आरक्षणाबाबत तपशील:

अनुसूचित जातीसाठी राखीव १ जागा मागील निवडणुकीत महिला राखीव असल्याने, यावेळी ती सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली.

अनुसूचित जमातींच्या ४४ जागांपैकी २२ जागा महिलांसाठी चिठ्ठीद्वारे सोडतीने आरक्षित करण्यात आल्या.

मागासवर्ग प्रवर्गातील ११ जागांपैकी ६ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.

सदर सोडतीची प्रक्रिया कुमारी स्वरा विजय कणखर (वय ६ वर्षे) हिच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, राजकीय पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सभेचे समारोप करताना महसूल उपजिल्हाधिकारी श्री. प्रमोद भामरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.

ही संपूर्ण सोडत प्रक्रिया न्याय्य, पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने पार पडली असून, या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.

#नंदुरबार#डॉमित्तालीसेठी#महिलासक्षमीकरण#जिल्हापरिषदनिवडणूक#PanchayatElection#ReservationDraw#WomenEmpowerment#DistrictAdministration#TransparentGovernance#InclusiveDevelopment#SmartNandurbar#PrashasanAplyaDarbarat#NandurbarUpdates#LokshahiDin

error: Content is protected !!