संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा महावितरणचे कार्यकारी संचालक चंद्रमणी मिश्रा यांचे निर्देश

नंदुरबार : संवेदनशील परिस्थितीत जळगाव परिमंडलातील कृषीसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी दक्ष राहा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) चंद्रमणी मिश्रा यांनी दिले.
संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा महावितरणचे कार्यकारी संचालक चंद्रमणी मिश्रा यांचे निर्देश
msedcl-executive-director-chandramani-mishra-power-supply-instructions

        महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयात सोमवारी (28 सप्टेंबर) झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता मदन सांगळे (जळगाव), अधीक्षक अभियंता संजय सरग (धुळे), अधीक्षक अभियंता सायस दराडे (नंदुरबार) यांची उपस्थिती होती. कार्यकारी संचालक मिश्रा म्हणाले की, कृषी ग्राहकांना नियमानुसार किमान 8 तास शक्यतो दिवसा वीजपुरवठा मिळेल, याची दक्षता घ्या. कृषिपंपांना वीज देण्याच्या निर्धारित वेळेत ती खं‍डित होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा. देखभाल–दुरुस्तीची कामे तातडीने करा. अनधिकृत वीजवापरावर नियंत्रण ठेवा. रोहित्रावर अतिभार येऊ नये यासाठी कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा. आपल्या कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींशी सुसंवाद ठेवा. प्रणाली सक्षमीकरण, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, वाहिनी विलगीकरण या योजनांच्या प्रगतीला वेग द्या, असे निर्देश मिश्रा यांनी दिले.
        वीजग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात महावितरणकडून ‘सेवा सेतू’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू करण्यात आले आहे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर (स्मार्ट) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या अंतर्गत जागेवरच ऑनलाईन अर्ज नोंदणी, योजनेचे आर्थिक फायदे व सौर संच बसविण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, कर्जाची सुविधा, अंदाजित खर्च यासाठी स्थानिक बँक प्रतिनिधी आणि निवडसूचीवरील सौर कंत्राटदार प्रतिनिधींशी थेट संपर्क व समन्वय करण्यात येत आहे. प्रलंबित अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे. नवीन घरगुती वीजजोडणी, नादुरुस्त रोहित्र विनाविलंब बदलणे, बिलावरील नावात बदल, मंजूर भार बदल, बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण, प्रलंबित तक्रारींचे निवारण तसेच विद्युत सुरक्षेसाठी वीज यंत्रणेमध्ये तांत्रिक उपाययोजना, देखभाल व दुरुस्ती आदी कामे या अभियानात केली जात आहेत. जळगाव परिमंडलातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे निर्देश कार्यकारी संचालक मिश्रा यांनी यावेळी दिले.

दरम्यान, कार्यकारी संचालक मिश्रा यांनी मंगळवारी धुळे जिल्ह्यातील बोरिस व मुकटी येथील 33 केव्ही उपकेंद्रांना भेट देऊन पाहणी कामकाजाची केली. उपकेंद्रांतील उपकरणे सुस्थितीत ठेवा, कृषी ग्राहकांना ठरवून दिलेल्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: