जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

(नंदुरबार) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली.
जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे
all-departments-coordination-reduce-district-road-accidents
         या बैठकीत जिल्ह्यातील विविध रस्ते प्रकल्प, अपघातप्रवण ठिकाणे आणि सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
        कोंडाईबारी घाटातील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना, गोमाई नदीवरील पुलाचे काम तात्काळ पूर्ण करणे, विसरवाडी–नंदुरबार व नंदुरबार–तळोदा रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच दोंडाईचा–नंदुरबार–धानोरा रस्त्याच्या कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत विचारणा करण्यात आली.
        मा.आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहर हद्दीतील रस्त्यांवर स्ट्रीट लाईट, डिव्हायडर व सुशोभीकरणाची कामे रस्ते कामासोबतच पूर्ण करण्याची आग्रही मागणी केली. मा.आमदार आमश्या दादा पाडवी यांनी अंकलेश्वर–बऱ्हाणपूर रस्ता तसेच अक्कलकुवा येथील जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याबाबत सूचना दिल्या.
       हातोडा पुलास कोणताही धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चरणमाळ, चांदसैली घाट, सावऱ्यादिगार पूल तसेच तोरणमाळ रस्त्याच्या कामांबाबतही चर्चा झाली.
रस्ते सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी दिले.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: