देवरे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग संस्थेचे समन्वयक शेख रियाज व दानिश शेख उपस्थित होते. यावेळी शेख रियाज यांनी आपत्तीचे प्रकार, स्वरूप, परिणाम, व्याप्ती, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संरचना, प्रथमोपचार आणि आपत्कालीन कृती यांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच संभाव्य धोके ओळखणे, संकटाच्या वेळी घ्यावयाची खबरदारी आणि स्वतःसह इतरांचे प्राण वाचविण्याच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक (Mock Drill) सादर केले.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांनी आपत्ती कोणत्याही वेळी उद्भवू शकते, त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहून आपत्ती व्यवस्थापनाचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संकटाचा सामना करण्याचे धैर्य, प्रसंगावधान आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.व्ही. नांद्रे,तर आभार एम. एस. मराठे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम. डी.नेरकर, वाय.डी. बागुल, डॉ.आर.आर. बागुल, ए.एस. बेडसे, एस.एच. गायकवाड, जे. एस.पाटील, एस. जी.पाटील, एच. एम. खैरनार आदींनी सहकार्य केले.

