Home शैक्षणिक जिल्ह्यातील शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; ऑनलाईन अर्जाचे आवाहन इतर मागास बहुजन...

जिल्ह्यातील शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; ऑनलाईन अर्जाचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सन 2026-27 शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

0
Government hostel admission process started in the district; Online application invited. Schedule for the academic year 2026-27 announced under the Other Backward Bahujan Welfare Department.

नंदुरबार(प्रतिनिधी):-शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक, नंदुरबार या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या मागासवर्गीय मुलांचे 1 व मुलींचे 1 अशा एकूण 2 शासकीय वसतीगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण तसेच व्यावसायिक व अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसह सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 07 ऑगस्ट  ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतीगृहाचे गृहपाल किंवा कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (सन 2026-27)
(12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यवसायिक अभ्यासक्रमासाठी) ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज भरण्याचा कालावधी 7 ते 31 ऑगस्ट 2026.
प्राप्त अर्जांची छाननी करण्याचा कालावधी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2026 पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करणे 8 सप्टेंबर 2026. पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत 18 सप्टेंबर 2026. रिक्त जागेवर प्रतीक्षा यादीतील दुसरी निवड यादी प्रसिद्ध करणे दि. 21 सप्टेंबर 2026. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2026. जिल्ह्यातील महाविद्यालयीन पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करून शासकीय वसतीगृह योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतीगृह तसेच सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय भवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असेही इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.