अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न
नंदुरबार:-माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, नंदुरबार व नंदुरबार जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 17 सप्टेंबर 2026, गुरूवार रोजी पार पडला.
या जिल्हास्तरीय मेळाव्यात एकूण 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचालित एकलव्य विद्यालय, नंदुरबार येथून इयत्ता 10 – इ चा विद्यार्थी कु. कृष्णा किशोर मराठे याने सहभाग नोंदवला. त्याला विज्ञान शिक्षक राहुल सुभाष भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेअंती परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार कु. कृष्णा याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आणि त्याची विभाग स्तरावरील विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
कु. कृष्णा याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुहास नटावदकर तथा मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी, संस्थेचे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे तथा सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विज्ञापित
विज्ञापित
Follow Us:

