उच्च व तंत्रशिक्षणातील विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफीसाठी २० लाखांचा निधी मंजूर

पात्रता आणि शैक्षणिक वर्ष: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील अवर्षण व दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला परिसंस्थांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.
उच्च व तंत्रशिक्षणातील विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफीसाठी २० लाखांचा निधी मंजूर
relief-higher-technical-education-students-exam-fee-waiver-20-lakh-fund-sanctioned
  • नियम व अटी:
    • सदर परीक्षा शुल्क माफी ही तात्कालीन व आगामी परीक्षांसाठी लागू असेल.
    • दुसऱ्यांदा परीक्षा देणारे (रिपीटर) किंवा बहि:स्थ (External) विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
    • इतर कोणत्याही योजनेतून १०० टक्के लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा दुहेरी लाभ घेता येणार नाही.
    • ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी महाडीबीटी पोर्टलद्वारे ५० टक्के परीक्षा शुल्क माफी मिळाली आहे, त्यांना उर्वरित ५० टक्के शुल्काची माफी दिली जाईल.
    • प्रत्यक्ष शहरात राहून नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या नावाने गावात शेतजमीन असल्यास, त्यांना ही सवलत अनुज्ञेय असणार नाही.

  • पुढील प्रक्रिया: कला परिसंस्थांनी परीक्षा शुल्क माफीसाठी सविस्तर प्रस्ताव सादर करणे आवश्यक असून, प्रस्तावातील माहिती आणि पात्रतेची तपासणी केल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: