Home सरकारी योजना तळोदा येथे वनपट्टे धारकांची सुनावणी व “Feeding India” उपक्रमांची पाहणी

तळोदा येथे वनपट्टे धारकांची सुनावणी व “Feeding India” उपक्रमांची पाहणी

Hearing of forest land holders and inspection of “Feeding India” initiatives at Taloda

स्थळ: तहसील कार्यालय, तळोदा

आज मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी तळोदा तहसील कार्यालय येथे वनपट्टे धारकांची सुनावणी घेतली. नागरिकांच्या दाव्यांवर प्रत्यक्ष संवाद साधत निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक व परिणामकारक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर “Feeding India” या स्वयंसेवी संस्थेच्या सेंट्रल किचनच्या प्रस्तावित ठिकाणाची पाहणी करण्यात आली. या उपक्रमाद्वारे बालकांना पोषणयुक्त जेवण उपलब्ध होणार असून, जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

याच उपक्रमाअंतर्गत, तळोदा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांचे पुनरविकसन करण्यात येणार आहे. यासाठी आज सोरापाडा १ आणि पिंपरपाडा १ येथील अंगणवाडी केंद्रांची पाहणी करण्यात आली.

उपस्थित अधिकारी:

कृष्णा राठोड – जिल्हा कार्यक्रम अधिकारी

दीपक धिवरे – तहसीलदार, तळोदा

राजू किरवे – गट विकास अधिकारी, तळोदा

सागर वाघ – बालविकास प्रकल्प अधिकारी, तळोदा

पवनकुमार पाटील – कार्यकारी अधिकारी, Feeding India

जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न – पोषण, शिक्षण व विकास यांचं बळ गावपातळीवर पोहोचवण्याचा!

#NandurbarDistrict#FeedingIndia#AnganwadiDevelopment#ForestRights#TALODAVisit#JillhaAdhikariNandurbar#ChildWelfare#PoshanAbhiyan#DistrictInAction

error: Content is protected !!
Exit mobile version