नंदुरबार जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात, गावागावात सध्या गाळ काढणे, शेततळे निर्माण व अस्तरीकरण यांसारखी जलसंधारण कामे वेगात सुरू आहेत.
या उपक्रमांमुळे स्थानिक रोजगार निर्माण, जलसाठा वाढ, आणि शेतीच्या उत्पादनक्षमतेत सुधारणा साधली जात आहे.
– गाळ काढण्याचे सामूहिक श्रमदान
– जलप्रवाह सुधारणा, भूजल वाढ व मृदासंवर्धन
– 2 बंधाऱ्यांतून गाळ काढण्याची कामे सुरू
– एकूण 179 मजुरांना रोजगार, सुमारे 4950 घन मीटर पाणी संचयाची क्षमता
– सिंचन विहिरींच्या पातळीत वाढ, बागायत क्षेत्र विस्तार
– शेततळ्याचे अस्तरीकरणाचे काम
– शाश्वत सिंचनासाठी पाऊल
– शेततळ्याचे नवीन काम सुरु
– शेतकऱ्यांसाठी पाणीसाठ्याचा नवा आधार
1. पाण्याचा प्रवाह सुरळीत होतो
2. पूर नियंत्रणास मदत
3. जलसाठ्याची क्षमता वाढते
4. गाळ शेतीसाठी फायदेशीर
5. पाणीटंचाई कमी होते
6. मृदासंवर्धन होते
अक्राणी, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, नवापूर व नंदुरबार –
या सर्व तालुक्यांतून मनरेगा अंतर्गत जलसंधारण व मृदासंवर्धनाची कामे सुरू आहेत, ज्यामुळे समृद्ध शेती, रोजगाराची हमी आणि जलशक्तीची सुरक्षितता निर्माण होत आहे.
#NandurbarWaterMission#MahatmaGandhiNREGA#Jalsandharan
