Home महाराष्ट्र मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा...

मॉरिशसच्या उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सदिच्छा भेट

High Commissioner of Mauritius Sheelabai Bappu paid a goodwill visit to Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar

मुंबई: मॉरिशस प्रजासत्ताकाच्या भारतातील उच्चायुक्त श्रीमती शीलाबाई बाप्पू यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची देवगिरी या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

भारत-मॉरिशस संबंधांना अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने श्रीमती सुनेत्रा अजित पवार व श्रीमती शीलाबाई बाप्पू यांच्यामध्ये भारत–मॉरिशस संबंध, महाराष्ट्र–मॉरिशस ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध, व्यापार-गुंतवणूक संधी तसेच पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.यावेळी मॉरिशसचे कॉन्सुल जनरल डॉ. डी. के. बकटोवार, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख,श्री.दयानंद बाप्पू उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version