मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी भालेर येथील एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रास भेट देऊन विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.
या पाहणीदरम्यान औद्योगिक क्षेत्रातील उपलब्ध सुविधा, प्रलंबित कामे, पायाभूत सुविधा तसेच उद्योगधंद्यांची सद्यस्थिती यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास, गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण करणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती वाढविणे या उद्देशाने ही पाहणी महत्त्वपूर्ण ठरली.
