
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज मोलगी परिसरातील कंजाला व मोलगी गावांना भेट देत रानभाजी जत्रा, मेराली जैवविविधता संकलन व संवर्धन केंद्र, अमोप शेतकरी उत्पादक कंपनी आणि राणीकाजल लोकसंचालित साधन केंद्र यांना भेट देऊन विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
1) रानभाजी जत्रा, कंजाला:
⦁ रानभाजी जत्र्याचे 12 वे वर्ष उत्साहात साजरे
⦁ 93 महिलांचा सहभाग, तब्बल 813 पाककृतींमधून 57 प्रकारच्या रानभाज्यांचे सादरीकरण
⦁ ज्वारी, मका, बाजरी, भगर भाकरी व डाळींसोबत देव पेंडी, अंबाडी, हेल्टा, जंगली कांदा, पोवाडा, बांबू, महू फुले अशा औषधी गुणधर्मयुक्त रानभाज्यांचा समावेश
⦁ रानभाज्यांचे पोषणमूल्य, अन्न सुरक्षा आणि परंपरागत ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अधोरेखित
2) मेराली जैवविविधता संकलन व संवर्धन केंद्र:
⦁ स्थानिक बियाणे, रानभाज्या, कंदमुळे व फुलांचे संरक्षण व संवर्धन
⦁ भगर, मका, ज्वारी, दादर, अंबाडी, जंगली भेंडी, दोडकी, गिलकी यासारख्या पिकांचे नमुने जतन
⦁ परंपरागत शेती साहित्य व माहिती फलकांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
3) अमोप शेतकरी उत्पादक कंपनी, मोलगी:
⦁ केंद्र सरकार व नाबार्डच्या उपक्रमांतर्गत स्थापन
⦁ DSC व कृषि विज्ञान केंद्राच्या सहकार्याने नागली, भगर, ज्वारी, बाजरी यांवर प्रक्रिया उद्योग सुरू
⦁ जिल्हाधिकारी यांनी शेतकरी सुविधा केंद्र, वार्षिक अहवाल, खरीप व रबी हंगाम नियोजनाची माहिती घेतली
⦁ आगामी काळात IIMR सहकार्याने मिलेट क्लस्टर विकसित करण्यावर भर
4) राणीकाजल लोकसंचालित साधन केंद्र, मोलगी:
⦁ माविम संचालित केंद्राला मा. जिल्हाधिकारींची भेट
⦁ भगर प्रक्रिया उद्योग, मशिनरी व मूल्यवर्धित पदार्थ (लाडू, चकली, बिस्कीट) निर्मितीचा आढावा
⦁ पॅकेजिंग, साठवणूक, दर्जा सुधारणा व विक्रीसाठी आवश्यक सहयोग देण्याचे आश्वासन
विशेष उपक्रम:
⦁ मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण
⦁ कंजाला व मोलगी येथील भेटींमुळे शेतकरी व महिलांमध्ये नवचैतन्य
या उपक्रमांमुळे सातपुडा परिसरात स्थानिक पिकांचे संवर्धन, पोषणमूल्य वाढ, महिलांचा सहभाग आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत शेतीला नवे बाजारपेठेचे दरवाजे उघडण्यास मदत होणार आहे.
#Nandurbar#RanbhajiJatra#Millets#FPO#Biodiversity#WomenEmpowerment#RuralDevelopment#MAVIM#NABARD