Home नंदुरबार जिल्हा जनगणना 2027 साठी पूर्वनियोजनाचा महत्त्वपूर्ण टप्पाजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व प्रशिक्षण संपन्न

जनगणना 2027 साठी पूर्वनियोजनाचा महत्त्वपूर्ण टप्पाजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक व प्रशिक्षण संपन्न

Important stage of pre-planning for Census 2027: Review meeting and training concluded at the District Collector's Office

(नंदुरबार) आगामी जनगणना 2027 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ही बैठक श्री. अजय ठाकुर, सहाय्यक संचालक, जनगणना कार्य निर्देशालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या प्रशिक्षण सत्रात श्री. अजय ठाकुर यांनी जनगणना 2027 करीता करावयाच्या विविध टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जनगणनेचे महत्त्व, माहिती संकलनाची अचूकता, डिजिटल साधनांचा वापर, क्षेत्रनिहाय नियोजन, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच वेळेचे काटेकोर पालन याबाबत त्यांनी सखोल प्रशिक्षण दिले. जनगणना ही देशाच्या विकास नियोजनाचा कणा असल्याने प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता व अचूकता आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या बैठकीमुळे नंदुरबार जिल्ह्यात जनगणना 2027 साठी प्रशासन सज्ज होत असून, नियोजनबद्ध व प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक दिशा मिळाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. जनगणना प्रक्रियेत प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित यंत्रणांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.

error: Content is protected !!
Exit mobile version