Home नंदुरबार जिल्हा अक्कलकुवा तहसील कार्यालयात महसूल वसुलीचा, पीक पाहणी व Agristack सखोल आढावा

अक्कलकुवा तहसील कार्यालयात महसूल वसुलीचा, पीक पाहणी व Agristack सखोल आढावा

In-depth review of revenue collection, crop inspection and Agristack at Akkalkuwa Tehsil Office

(नंदुरबार) अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे आदरणीय विभागीय आयुक्त तसेच मा. डॉ. मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी श्री. नामदेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीमध्ये तालुक्यातील पीक पाहणी, Agristack नोंदणी तसेच महसूल वसुली / महसुली विषयां संदर्भात सविस्तर चर्चा करून सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. पीक पाहणी व Agristack नोंदणी ही शासनाच्या महत्त्वाच्या डिजिटल उपक्रमांपैकी असून, या कामकाजात अचूकता, वेळबद्धता आणि पारदर्शकता राखण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

पीक पाहणी प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांच्या पीकस्थितीची अचूक नोंद होणे, नुकसान भरपाई, पीक विमा व विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होते. त्यामुळे प्रत्यक्ष शेतपातळीवर कार्यरत यंत्रणेने जबाबदारीने व समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.

Agristack अंतर्गत शेतकरी व शेतीसंबंधी माहितीचे डिजिटायझेशन होत असून, ही माहिती भविष्यात धोरणात्मक निर्णयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अपूर्ण नोंदी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

तसेच विविध महसुली बाबींच्या वसुलीबाबत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन वसुलीची गती वाढविणे, शासनाच्या उत्पन्नात वाढ करणे आणि नियमबद्ध कार्यवाही सुनिश्चित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून उद्दिष्टपूर्ती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

अशा आढावा बैठकीमुळे तालुकास्तरावर प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम, परिणामकारक व लोकाभिमुख होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

#Akkalkuwa#Nandurbar#CropSurvey#Agristack#RevenueReview#DigitalAgriculture#GoodGovernance#TalukaAdministration

error: Content is protected !!
Exit mobile version