महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM), नंदुरबार यांच्या वतीने नवतेजस्विनी प्रकल्पाच्या GIB घटकांतर्गत अक्काराणी लोकसंचलित साधन केंद्र, धडगाव (CMRC) येथील प्रतिनिधी नियामक मंडळ (RGB) सदस्यांसाठी ‘प्रशासकीय, आर्थिक व्यवस्थापन व व्हिजन बिल्डिंग’ या विषयावर दि. १९ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान माविमघर, नंदुरबार येथे तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून नंदुरबारचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती कांतागौरी बनकर, धुळे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. जगन्नाथ वानखेडकर,माविमचे माजी जिल्हा समन्वयक श्री. सादिक शेख, प्रेरणा CMRC मधील गावप्रतिनिधी श्रीमती रमिला वसावे, व्यवस्थापक श्रीमती खालिदा खाटिक तसेच लेखापरीक्षक श्री. सुरज अग्रवाल उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये प्रतिनिधी नियामक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यशाळेदरम्यान MAVIM चे ध्येय व धोरण, CMRC संकल्पना, प्रतिनिधी नियामक मंडळाच्या भूमिका व जबाबदाऱ्या,महिला गाव समिती चे महत्व, प्रशासकीय रचना, आर्थिक व्यवहार व व्यवस्थापन, CMRC चे व्हिजन तसेच नव-तेजस्विनी कार्यक्रम या विषयांवर सादरीकरणे, गटचर्चा, खेळ व सहभागी पद्धतींच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडले.
कार्यशाळेच्या शेवटी सहभागी महिलांकडून फीडबॅक घेण्यात आला असून, पुढील तीन महिन्यांत पूर्ण करावयाच्या जबाबदाऱ्यांसाठी कृती आराखडा (Action Plan) तयार करण्यात आला. या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रकल्प सल्लागार, MIS, लिपिक व लेखा सहाय्यक यांनी विशेष सहकार्य केले.
