Home महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत

In the presence of Chief Minister Devendra Fadnavis to give a major boost to the state's industrial and technology sector

उद्योग विभाग आणि ‘एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड’ समवेत १ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्यकरार करण्यात आला.

या सामंजस्य करारामुळे एमएमआर क्षेत्रात (MMR) ‘इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क’ आणि ‘एआय कॉम्प्युट हब’ उभारला जाणार तसेच उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा ८ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि ऑपरेशन्स टीमचा समावेश असेल. प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत सुमारे २ हजार अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

मुख्यमंत्री समिती कक्षात झालेल्या या कराराच्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बलगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, एएम इंटेलिजन्स लॅब्जचे अध्यक्ष अनिल चलमलाशेट्टी, संचालक मौर्य पायदा, उपाध्यक्ष पंकज कुमार आदी उपस्थित होते.

#MoU

#Industry

error: Content is protected !!
Exit mobile version