Home नंदुरबार जिल्हा नवापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत : प्राचार्य

नवापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरावेत : प्राचार्य

Navapur ITI admission
Navapur ITI admission

(नवापूर) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यांत आलेली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन नवापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी. एस. जैन यांनी केले आहे. (ITI Navapur Admission – Online Application)

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत (ITI Navapur Admission – Online Application)

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया 12 जून-2023 पासुन सुरु करण्यांत आलेली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावेत.दहावी उत्तीर्ण अथवा अनुतीर्ण इच्छुक विदयार्थ्यांनी / विदयार्थीनींनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून 11 जूलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. संस्थेत तयार करण्यांत आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतींची माहिती पुस्तिका डिजिटल स्वरुपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन आपला अर्ज निश्चित करावा. व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत संस्थेत समुपदेशन करण्यांत येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यांत येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर मध्ये प्रवेशासाठी 312 जागा उपलब्ध (ITI Navapur Admission – Online Application

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर (जि.नंदुरबार) मध्ये एकुण 13 व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून 312 एवढ्या जागा प्रवेशासाठी या उपलब्ध आहेत. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औ.प्र. संस्थांचे आधुनिकीकरण करण्यांत येत आहे.

विदयावेतन / निर्वाह भत्ता मिळणार (ITI Navapur Admission – Online Application)

आय.टी.आय.प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यांत येणऱ्या विदयावेतन / निर्वाह भत्ता वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यांत आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यांत आलेली आहे. दहावी अनुतीर्ण विदयार्थ्यांना आय.टी.आय. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यांत येते, तर दहावी उत्तीर्ण विदयार्थ्यांना आय टी आय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार इ. 12 वी समकक्षता प्रदान करण्यांत येते, तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुतीर्ण विदयार्थ्यांना आवाहन करण्यांत येते की, आय.टी.आय.तून व्यवसायीक शिक्षण पूर्ण करुन त्वरीत रोजगार,स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी प्रवेश घ्यावा असेही नवापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.एस. जैन यांनी केले आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version