(शहादा) कृषी उत्पन्न बाजार समिती,शहादा चे सभापती अभिजीतदादा पाटील यांनी शहादा शहरातील व तालुक्यातील सर्व सुजाण नागरिकांना आजपासुन सुरु होणार्या “जल जंगल संवर्धन” अभियानात सहभागी होण्जायाचे हीर आवाहन केले आहे.
दुष्काळ घिरट्या घालत आहे. यावर्षीच्या हवामानाच्या अंदाजाप्रमाणे आत्ता पर्यंत केवळ 380 मिलिमीटरच्या आसपास पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिनासुद्धा पावसाविना जाणार अशी भीती निर्माण झाली आहे. आत्ता अपेक्षा फक्त परतीचा पाऊस पडेल अशी आहे. आणी तस न झाल्यास यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. (Nandurbar News)
शासन काहीतरी करेल ह्यापेक्षा ह्या संकटाशी आपणच लढू शकतो आणी आपणच आपल्या जल-जंगल संवर्धना साठी सुरु होत असलेल्या मोहीमेत सहभागी होऊ शकतो.
घर आणी कॉलनी परिसरात ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’ म्हणजेच पावसाच्या पाण्याचा थेंब ना थेंब जमिनीत जिरवण्याची मोहीम राबवणार.
1. गाव तलावाचा लोकसहभागातून गाळ काढणे
2. नदी पात्रात नांगरटी करणे
3. शेत शिवाराला लागून असेलेलल्या नाल्यांचे रुंदीकरण करणे
सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब हा जमिनीतच जिरला पाहिजे हाच ह्या मोहिमेचा उद्देश आहे. आपला सहभाग लाख मोलाचा आहे. या मोहिमेत तालुक्यातील सेवा भावी संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, राजकीय पक्ष, सुजान नागरिकांनी सहभागी व्हावे अशी विनंती,कृषी उत्पन्न बाजार समिती,शहादा चे सभापती अभिजीतदादा पाटील यांनी केली आहे. (Nandurbar News)
संभाव्य दुष्काळी परिस्थिती पहाता शहादा फर्स्ट ची बैठक शहादा येथे पार पडली. ह्या बैठकीला पाणी फौंडेशन चे महाराष्ट्र समन्वयक डॉ. अविनाश पोळ आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.2 सप्टेंबर 2023,रोजी होणाऱ्या जल-जंगल संवर्धन अभियानात संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन भविष्यातील संकटासाठी आत्तापासून तयारी करावी असे सर्वानुमते ठरले, तसेच येत्या दोन दिवसात वरिष्ठ आणि अनुभवी लोकांची एक समिती तयार करून अभियानाचा आराखडा सार्वजनिक करण्यात यावा असे ठरले. या अभियानात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावे असेही नमुद करण्यात आले. (Nandurbar News)
सदर बैठकीला पीआय राजन मोरे सर, आर्ट ऑफ लिविंग चे किशोर पाटील, माननीय दत्ता वाघ, रवी काका जमादार, दादा भाई पिंपळे, लोटन काका, कोमल भाऊसाहेब, एडॅ. चव्हाण, सौरभ जहागीदार, भारती पवार, लीना पाटील यांनी आपले विचार मांडले. एकतेचे बळ दाखवूया, पाण्याचे संवर्धन करूया असे आवाहन जल जंगल संवर्धन अभियान समन्वय समिती मार्फ़त करण्यात आले आहे.