
आत्मा योजने अंतर्गत सन 2025-26 साठी ‘किसान गप्पा गोष्टी’ कार्यक्रम मौजे तळवे–सलसाडी येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. तालुका कृषि अधिकारी सौ. मीनाक्षी वळवी यांनी भूषवले. या प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथील प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. विकास आहिराव, कृषी अधिकारी श्री. भावसार, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. दीपक पावरा आणि श्री. शिलदार पावरा उपस्थित होते.
कार्यक्रमातील महत्त्वाचे मुद्दे:
तळवे व प्रतापपूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बलराम शेतकरी गटाचे सदस्य श्री. विजय सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘किसान गप्पा गोष्टी’ कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक शेती मार्गदर्शन पोहोचविणे, रब्बी हंगामातील पिकांची योग्य तयारी, रोग-कीड नियंत्रण, तसेच आधुनिक शेती पद्धतींचा प्रसार हा उद्देश प्रभावीपणे साध्य करण्यात आला.
#KisanGappaGoshti#ATMA#NandurbarAgriculture#TalveSalasadi#KVKKolda#RabiSeason2025#ShetiMargdarshan#SeedTreatment