Home महाराष्ट्र वाडीवऱ्हे येथील बजाज इलेक्ट्रॉनिक्स कामगार प्रकरणी ३१ मार्चपर्यंत लेखी निवेदनांचे कामगार मंत्री आकाश फुंडकर...

वाडीवऱ्हे येथील बजाज इलेक्ट्रॉनिक्स कामगार प्रकरणी ३१ मार्चपर्यंत लेखी निवेदनांचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे निर्देश

Labour Minister Akash Fundkar directs for written submissions by March 31 in the Bajaj Electronics workers' case in Wadivarhe

मुंबई, दि. २४ : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील मे. बजाज इलेक्ट्रॉनिक्स लि. मधील कामगारांच्या स्वेच्छानिवृत्ती प्रकरणाचा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आढावा घेतला. कामगारांवर अन्याय होऊ नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले.

कंपनी प्रशासन व कामगार प्रतिनिधींनी आपले लेखी म्हणणे ३१ मार्चपर्यंत सादर करावे, असे निर्देश  कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बैठकीत दिले.

फेब्रुवारी २०२४ मध्ये कंपनीने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. संबंधित कामगारांकडून सक्ती झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून, व्यवस्थापनाने सध्याच्या परिस्थितीत मूळ पदांवर काम उपलब्ध नसल्याने पर्यायी स्वरूपात इतरत्र काम देण्याची तयारी दर्शविली आहे.

कामगार उप आयुक्त कार्यालयामार्फत प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असून, सर्व बाबींचा विचार करून न्याय्य निर्णय घेतला जाईल, असे मंत्री आकाश फुंडकर यांनी नमूद केले.

बैठकीस आमदार सीमाताई हिरे, प्रधान सचिव आय ए कुंदन, कामगार आयुक्त डॉ एच पी तुम्मोड तसेच संबंधित अधिकारी, कामगार प्रतिनिधी आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version