Home महाराष्ट्र जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता...

जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची शिष्टमंडळासह मंत्रालयात भेट घेतली.

Lieutenant Governor of Hokkaido Prefecture, Japan, Kano Takayuki, along with a delegation, met with Minister for Skills, Employment, Entrepreneurship and Innovation, Mangal Prabhat Lodha, at the Ministry.

राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी दिली.

जपानमध्ये कृषी, वैद्यकीय, विविध तंत्रज्ञ, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे. भारतीय युवक अधिक कार्यक्षमतेने काम करत असून भारतीय कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जगभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी सांगितले.

होक्काईडो हा जपानच्या उत्तरेकडील प्रांत असून, जपानचा जवळपास २२ टक्के भाग या प्रांताने व्यापला आहे. या प्रांतात कृषी, मत्स्य, उद्योग, बांधकाम आणि पायाभूत सुविधा तसेच नर्सिंग क्षेत्रात मनुष्यबळाची नितांत गरज आहे. त्यानुसार कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी होक्काईडो प्रांताने आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रांताच्या शिष्टमंडळाने मंत्री लोढा यांची भेट घेतली.

error: Content is protected !!
Exit mobile version