
विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ बाबत आयोजित आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते.
पुढील वीस-पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तयार होत असताना आपले ध्येय आणि त्यांची दिशा निश्चित असणे आवश्यक आहे. सादरीकरण केवळ कागदोपत्री न राहता ते प्रत्यक्षात साध्य होण्यासाठी आपली संपूर्ण क्षमता लावणे आवश्यक आहे. विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांच्या गुणवत्ता वाढीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.